Ajit Pawar Live : ‘विरोधकांचं म्हणजे, खोटे बोल पण रेटून बोल…’; बारामतीतून अजित पवारांचा हल्लाबोल !

Updated On:

Ajit Pawar :  विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. विधानसभेच्या सर्वच्या सर्व २७४ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यामध्ये अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. राजेश विटेकर २३ आणि शिवाजी गर्जे २४ मत मिळाली. लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार गटाचा हा पहिलाच मोठा विजय आहे.

लोकसभा निवडणुकांनंतर होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका महायुतीतील पक्षांसाठी आगामी विधानसभा निवडणुकांचं गणित सेट करण्यासाठी महत्वाच्या असल्याचं मानलं जात आहे. आणि याच पार्श्ववभूमीवर बारामतीमध्ये आज (दि. १४ जुलै) अजित पवार गट शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज बारामतीमध्ये जनसन्मान महामेळावा आयोजीत करण्यात आलाय. या मेळाव्यासाठी अजित पवार गटाच्या सर्व आमदार आणि खासदार उपस्थित आहेत. या महामेळाव्यातून अजित पवार विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.

अजित पवारांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे !

– राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, म. ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करुन ‘जन सन्मान रॅली’ सोहळ्याला सुरूवात!

– बारामतीत अजित पवार गटांचा जनसन्मान सोहळा पार पडला. तेव्हा अजित पवारांचं भाषण सुरू असताना पावसाने हजेरी लावली. तेव्हा अजित पवारांनी भरपावसात भाषण केलं. त्यावेळी इतर नेत्यांनी त्यांना साथ दिली.

–  लोकसभा निवडणुकीत वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. खोटे बोल पण रेटून बोल असं वातावरण विरोधकांनी तयार केले. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलत होतो. पण कुठल्याही जाती धर्माच्या लोकांवर अन्याय होणार नाही. असा शब्द महाराष्ट्राच्या जनतेला देतो.

–  आम्ही महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणली. सोयाबिन आणि कापूस उत्पादकांना दोन-दोन हजार दिले  माझ्या आया बहिणींना वर्षाला १८० कोटी मिळणार  आहेत. तीन सिलेंडरचे पैसे थेट बहिणींच्या खात्यात जाणार आहेत.

– 65 हजार कोटी खर्च करून महिलांसाठी योजना आणल्या. विकासाला डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काम करेल. राष्ट्रवादीने विकासाला प्राधान्य दिल्याचे अजित पवार यांनी नमुद केले.

–  काही काही हवसे नवसे गवसे येतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, भावनिक होऊ नका, भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

2026-10-08 22:14:41

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र