दिवसा पथदिवे सुरू असल्याचे पाहून अजित पवारांचा पारा चढला; ग्रामसेवकाला सुनावले खडेबोल
Updated On:

बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. पवार हे कृषी विभाग तालुका फळ रोपवाटिका कण्हेरी याठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहचले होते. पाहणी करत असताना त्यांची नजर पथदिव्या कडे गेली.
सकाळचे साडेआठ वाजले तरीदेखील पथदिवे चालू असल्याचे निदर्शनास येताच अजित पवार यांचा पारा चढला आणि त्यांनी गटविकास अधिकारी यांना ताबडतोब ग्रामसेवकाला नोटीस काढण्याचे आदेश दिले.
जनतेचा पैसा आहे, टायमिंगलाच लाईट बंद झाली पाहिजे, ग्रामसेवक बडवा काय करतो, ग्रामसेवकांच्या बापाची पेंड आहे का ? म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवसा चालू असलेल्या लाईट वरून ग्रामसेवकाला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.





