Ajit Pawar Funeral : काटेवाडीत आणले अजित पवार यांचे पार्थिव ; उसळला जनसागर ; थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार
Ajit Pawar Funeral :

Ajit Pawar Funeral : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. विमान उतरण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला, ज्यामध्ये अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनेराज्यात राजकीय पोकळी निर्माण झाली. दरम्यान , अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीत आणले गेले आहे.
अजित पवार यांचे पार्थिव काल संध्याकाळी अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते. आपल्या लाडक्या नेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी जनसागराचा महापूर लोटला होता. “अजितदादा परत या…” अशा आर्त हाकांनी बारामतीचे आकाश फाटून गेले होते. Ajit Pawar Funeral :
सामान्य नागरिक, शेतकरी आणि कार्यकर्त्यांना यावेळी आपला शोक अनावर झाला. रात्री उशिरा पार्थिव पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले असून, आज सकाळी ते त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणले . काटेवाडीत सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबीय देखील दाखल झाले आहेत. सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार काटेवाडीत पोहचले आहेत.
महाराष्ट्र सरकारने तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे एएआयबी या अपघाताची चौकशी करत आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) देखील दाखल केला आहे. Ajit Pawar Funeral :





