Ajit Pawar Death : अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला पंतप्रधान मोदी का येऊ शकले नाहीत? ; समोर आले ‘हे’ कारण
Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते.

Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजित पवारांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
अमित शाह यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील अंत्यसंस्काराला उपस्थित राहतील असे म्हटले जात होते. मात्र पंतप्रधान मोदी येऊ शकले नाहीत. याचे कारण आता समोर आले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र केंद्राचे प्रतिनिधित्व गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
दरम्यान, आपल्या लाडक्या दादाला जनसागराने पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. सकाळपासूनच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. “अजितदादा परत या”, “अजितदादा अमर रहे” यासारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
अंत्यसंस्काराला दिग्गज नेत्यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून शोकसंदेश पाठवला असून, त्यांच्या अनुपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बारामतीत येऊन श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि इतर राज्यांतील मंत्र्यांनीही हजेरी लावली.

दरम्यान , 28 जानेवारी रोजी झालेल्या या भीषण अपघाताच्या मुळाशी जाण्यासाठी दोन स्तरावर तपास सुरू झाला आहे. AAIB (नागरी विमान वाहतूक मंत्रालय) ने तांत्रिक तपासासाठी विमानातून ब्लॅक बॉक्स जप्त केला आहे.
यातून वैमानिकांचे शेवटचे संभाषण आणि तांत्रिक बिघाडाची माहिती समोर येईल. तर पुणे ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची (ADR) नोंद केली आहे. हा तपास आता महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात येणार आहे.





