Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती येथे विमानाचे लँडिग होत असताना त्यांचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की विमान जळून खाक झाले आहे. त्यांच्या या अचानक घेतलेल्या एक्झिटने संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधानावर शोक व्यक्त केला. भाजपचे नेते सुरेश धस यांनी देखील प्रसार माध्यामांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्याबद्दल बोलताना सुरेश धस म्हणाले, “अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. पण आम्हाला शाप आहे की काय, असंच वाटायला लागलंय. याआधी विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे हेही काही काळ बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि ते दोघेही अकाली गेले. “आमचे दादा पालकमंत्री झाले आणि जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागू लागले होते. विकासाची गती दिसू लागली होती. आता अजितदादाही आपल्यातून निघून गेले. ६७, ६६ आणि ६४ अशा वयात ही तीन मोठी नेतृत्वं हरपणं हे अत्यंत वेदनादायक आहे. हे आमचं बीड जिल्ह्याचं दुर्दैव आहे.” Ajit Pawar : ‘पोकळ आश्वासन देणारे अजित पवार नव्हते’ “कुठलाही प्रश्न त्यांच्या समोर मांडला की ते एक घावात दोन तुकडे करणारा निर्णय घ्यायचे. पोकळ आश्वासन देणारे ते कधीच नव्हते. काम होणार असेल तर स्पष्ट हो आणि नसेल तर ठाम नाही म्हणण्याची प्रामाणिकता त्यांच्यात होती,” असेही यावेळी सुरेश धस म्हणाले. Suresh Dhas : ‘हे आमचं बीड जिल्ह्याचं दुर्दैव’ ते पुढे म्हणाले, “आज महाराष्ट्रात अशी निर्णयक्षमता असलेली दुसरी व्यक्ती नाही. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा, प्रशासनावर पकड असलेला आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारा नेता आपण गमावला आहे. ही पोकळी सहज भरून निघणारी नाही.” अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार दरम्यान, नुकतेच बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष नितिन नवीन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. इतरही अनेक राजकीय नेते, मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. Ajit Pawar : हेही वाचा: Ajit Pawar : अजित पवारांना अखेरचा निरोप..! पार्थ पवार आणि जय पवार यांनी दिला लाडक्या बाबांना अग्नी