Ajit Pawar Death: “खूप धक्कादायक… विश्वास बसत नाहीये”; अजित पवारांच्या निधनाने मराठी कलाकार हळहळले
Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह अन्य तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक आणि कलाविश्वातही तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत अजित पवारांना (Ajit Pawar) श्रद्धांजली वाहिली आहे.“अजितदादा, विश्वास बसत नाहीये… खूप मोठा धक्का आहे,” अशा शब्दांत काही कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर काहींनी “महाराष्ट्राने एक कणखर नेतृत्व गमावलं” असे म्हणत त्यांच्या कार्याचा उल्लेख केला.

Ajit Pawar
इन्स्टाग्राम स्टोरीज आणि पोस्टमधून कलाकारांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी कला, कलाकार आणि सांस्कृतिक उपक्रमांना दिलेल्या पाठिंब्याचीही आठवण अनेकांनी करून दिली.
View this post on Instagram
प्रसिद्ध मराठी गायक सलील कुलकर्णी यांनी “विश्वासचं बसत नाही…अजितदादा” असं म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे जात असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते सभेसाठी बारामतीला जाणार होते. त्यांच्या अकाली जाण्याने राज्यभर शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहिली जात आहे.