Sharad Pawar : राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले अजितदादांच्या निधनानंतर…
Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर अखेर शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट भूमिका मांडत सस्पेन्स संपवला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर या चर्चांना पूर्णविराम लागल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले की, “विलिनीकरणासंदर्भात आमच्या पक्षाकडून जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर ही प्रक्रिया थांबली. सध्या आमच्या पक्षात या विषयावर कोणतीही चर्चा झालेली नाही.” Sharad Pawar
त्यांनी पुढे सांगितले की, या विषयावर अजित पवारांसोबत पाच ते सहा बैठका झाल्या होत्या. त्या बैठकीनंतर दोघांपैकी एक जण येऊन त्यांना माहिती देत असे. “भविष्यात ही प्रक्रिया पुन्हा सुरू होईल का, याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. Sharad Pawar

Sharad Pawar : राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले अजितदादांच्या निधनानंतर…
शरद पवारांनी अजित पवारांच्या भूमिकेबाबत बोलताना सांगितले की, “त्यांचा दृष्टिकोन आमच्या कार्यकर्त्यांना समाधान देणारा होता. मात्र त्यांच्या जाण्यानंतर ही प्रक्रिया पुढे सरकली नाही.” सध्या पक्षाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, आपल्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच पुन्हा जनतेमध्ये सक्रिय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. Sharad Pawar
दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “निवडणुकीत विरोधक उभे राहणार हे गृहित धरूनच लढावं लागतं. एखाद्या मतदारसंघात पक्षाने भूमिका घेतली, तर तो राजकीय प्रक्रियेचा भाग आहे,” असे ते म्हणाले. Sharad Pawar
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sharad Pawar)





