Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून साधला शरद पवारांशी संवाद ; शोक व्यक्त करत केले सांत्वन
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे.

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. अपघातात अजित पवार यांच्यासह अन्य सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar)यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-(शरदचंद्र पवार)चे प्रमुख शरद पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला. त्यासोबतच शरद पवार यांचे सांत्वन करत आपण पवार कुटुंबाच्या दुखत सहभागी असल्याचे म्हटले.
त्यापूर्वी सकाळी अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर येताच पंतप्रधानांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान मोदी यांचे ट्वीट Ajit Pawar :
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत लिहिले की, “अजित पवार हे जनतेचे नेते होते, त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे.
श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची… pic.twitter.com/Rn1E8OXQRm
— Narendra Modi (@narendramodi) January 28, 2026
प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती.’





