Ajit Pawar : उद्या होणार अजित दादांवर अंत्यसंस्कार.! बारामतीत लोकांची मोठी गर्दी
Ajit Pawar : अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. उद्या (गुरुवारी) बारामती मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगितलं आहे.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांची अपघातात अशी अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीच्या महिन्यातच या दुःखद बातमीने महाराष्ट्र हादरला आहे.
संपूर्ण बारामती सुन्न झाली असून मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. अनेक राजकीय मंडळींना अश्रु अनावर झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली असून, अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. उद्या बारामती मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगितलं आहे.
अनेक ठिकाणी गावे, मार्केट यार्ड बाजारपेठा बंद असून शिक्षण संस्था आणि शाळा महाविद्यालय बंद आहेत. यासोबतच अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण बारामती बंद करण्यात आली आहे. अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते.
ही बातमी वाचा : Ajit Pawar Plane Crash : अर्ध्यावरती डाव मोडला…! 37 वर्षांच्या दादा-वहिनींच्या प्रवासाची कहाणी राहिली अधुरी
मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षा अधिकारी, दोन पायलट आणि इतर सहकारी यांचा समावेश आहे. मृतकांची यादी नुकताच अधिकृतपणे जाहीर झाली आहे.
नेमकं काय घडलं?
आज सकाळी नियोजीत सभेसाठी अजितदादा हे बारामतीसाठी निघाले. बारामती विमानतळावर विमान लॅडिंग करण्यापूर्वीच ते हेलकावे खात खाली कोसळले. शेजारील शेतात विमान कोसळले. सकाळी 8:30 वाजेच्या आसपास विमान कोसळल्याचे समजते. त्यावेळी आजूबाजूच्या वस्तीवरील लोकांनी धाव घेतली.





