प्रभात वृत्तसेवा पुणे – पुण्यातील नागरिकांना मूलभूत देण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करत असतो. अधिकारी मात्र कामाचे नीट नियोजन करत नाहीत. काम करताना चुका करता त्यामुळे अनेक शहरातील अनेक पुलाचे नियोजन चुकल्यामुळे ते पाडण्याची वेळ आली. नागरिक त्याचे खापर आमच्यावर फोडतात. चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीच्या कालावधीत शहरात ड्रेनेजची झाकणे समांतर बसविण्याची कामेही पूर्ण झालीच नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाचे वाभाडेच काढले.महापालिकेतर्फे आयोजित विकासकामांच्या उद्धाटन, भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कोविडच्या काळात गणेशखिंड रोडवरील पूल पाडावा लागला. आता मगरपट्टा येथील पूल पाडण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रशासकीय राजवटीच्या चार वर्षाच्या काळात काय केले, असा प्रश्न निर्माण आहे. सेवानिवृत्तीनंतर ते घरी आराम करतात. मात्र, आम्हाला नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात, असे पवार यांनी म्हणाले. शासनाने पुणे पोलीस विभागाला प्रशस्त कार्यालये, वाहने, मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आता कोयता गँग दिसता कामा नये, गुंडगिरी, दहशत मोडीत काढण्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.