Ajinkya Rahane Statement : ‘मी कोणालाही हे सिद्ध करण्यासाठी खेळत नाहीये’, अजिंक्य रहाणेनं टीकाकारांना दिलं सडेतोड प्रत्युत्तर
Ajinkya Rahane Statement : अजिंक्य रहाणेने आपल्या भविष्याबाबत सुरू असलेल्या सर्व अटकळ फेटाळून लावताना टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

Ajinkya Rahane Statement IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध झुंजार खेळी केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या निवृत्तीच्या चर्चांवर मौन सोडले आहे. ३७ वर्षीय रहाणेने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत, आपण कोणालाही काही सिद्ध करण्यासाठी नाही, तर स्वतःच्या आनंदासाठी खेळत असल्याचे स्पष्ट केले. यासह त्याने एस बद्रिनाथसह इतर टीकाकारांची बोलती बंद केली.
अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ४० चेंडूत ६७ धावांची वादळी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने आपल्या भविष्याबाबत सुरू असलेल्या सर्व अटकळ फेटाळून लावल्या आहेत. भारतासाठी २०२३ मध्ये शेवटचा सामना खेळलेला रहाणे म्हणाला, “लोक माझ्याबद्दल काय बोलतात याने मला फरक पडत नाही. मी कोणालाही हे सिद्ध करण्यासाठी खेळत नाहीये की माझ्याकडे किती कौशल्य आहे. मी स्वतःच्या प्रगतीसाठी आणि फलंदाजीच्या आनंदासाठी मैदानात उतरतो.” काही दिवलसांपूर्वी एस बद्रिनाथ म्हणाला होता की, अजिंक्य रहाणे कमजोर कर्णधार आहे. आता अजिंक्यने त्याची बोलती बंद केली आहे.
🚨AJINKYA RAHANE IS WEEK CAPTAIN – S BADRINATH.🚨
He Said🎙️ – Ajinkya is a very weak captain, ” KKR invest – Harshit Rana, Pathirana & Mustafizur who is ruled out🤨
He also said – why they purchase costly Cameroon Green at 25 Crore 🤯pic.twitter.com/ur8qAj400M
— Sam (@Cricsam01) March 20, 2026
बुमराह ठरला गेमचेंजर –
🚨“LET THEM TALK” – AJINKYA RAHANE ON CRITICS🚨
He said🎙️- People have been talking about me for years, let them talk. I’m really happy with how I’m batting right now. I’m not here to prove anything to anyone. Growth as a cricketer is what matters most🤯pic.twitter.com/iEzUkQ6PEh
— Sam (@Cricsam01) March 30, 2026
केकेआरच्या पराभवाचे विश्लेषण करताना रहाणेने जसप्रीत बुमराहचे विशेष कौतुक केले. तो म्हणाला, “आम्ही २३५ ते २४० धावांच्या दिशेने वाटचाल करत होतो, पण बुमराहच्या शेवटच्या दोन षटकांनी सर्व समीकरणे बदलली. त्यामुळेच तो जगातील महान गोलंदाज आहे.” बुमराहच्या अचूक गोलंदाजीमुळे कोलकात्याला अपेक्षित मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
मुंबईचा १४ वर्षांचा ‘शाप’ संपला!
या विजयासोबतच मुंबई इंडियन्सने एक नकोसा विक्रम मोडीत काढला आहे. २०१३ पासून सलग १३ हंगाम मुंबई आपला पहिला सामना हरत होती. मात्र, रोहित शर्मा (७८ धावा) आणि रायन रिकलटन (८१ धावा) यांच्या १४८ धावांच्या सलामीच्या भागीदारीमुळे मुंबईने २२४ धावांचे लक्ष्य १९.१ षटकांत गाठले. मुंबईने तब्बल १४ वर्षांनंतर (२०१२ नंतर पहिल्यांदाच) आपला आयपीएलमधील सलामीचा सामना जिंकला आहे.





