#INDvSA 1st Test | ‘वॉच द बॉल’ चा रहाणेचा जप
Updated On:

सेंच्युरीयन – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अखेर भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे याला सुर गवसल्याचे दिसले. त्याचवेळी एक अनोखी माहिती समोर आली आहे.
फलंदाजीत सातत्याने अपयशी ठरत असलेला रहाणे प्रत्येक चेंडूचा सामना करण्यापूर्वी काहीतरी पुटपुटत असल्याचे कॅमेराने टीपले. तो नक्की काय करतोय ते माहिती करुन घेण्याची उत्सूकता निर्माण झाली होती.
अखेर हे गुपीत उलगडले असून रहाणे प्रत्येक चेंडूपूर्वी वॉच द बॉल (प्रत्येक चेंडू काळजीपूर्वक पहा व मग खेळ) हेच तीन शब्द जप केल्यासारखे म्हणत होता.
त्याच्या फलंदाजीमधील या सकारात्मक बदलामागे हे तीन शब्दांचा जप करत त्याने स्वत:ला दिलेले प्रोत्साहनच यशस्वी ठरत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली होती.





