Ajay Ratra Joins BCCI Selection Commitee : भारतीय संघाला 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या दृष्टिकोनातून ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. त्याआधी दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धा होणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या क्रिकेट सल्लागार समितीने निवड समितीमध्ये नवीन सदस्य म्हणून अजय रात्रा यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी पाच सदस्यीय निवड समितीमध्ये मुंबईचे माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांची जागा घेतली असून येत्या गुरुवारपासून ते औपचारिकपणे त्यांची भूमिका स्वीकारतील.
अजय रात्रा हे हरियाणाचे आहेत आणि ते भारतासाठी 6 कसोटी आणि 12 एकदिवसीय सामने खेळणारे यष्टिरक्षक फलंदाज आहेत. बीसीसीआयने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “अजय यांचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगले आहे. त्यांनी आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 99 सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर 4,029 धावा आहेत. या काळात त्यांनी 8 शतके आणि 17 अर्धशतकांच्या खेळीही खेळल्या आहेत.
NEWS – Ajay Ratra appointed member of Men’s Selection Committee.
Mr Ratra will replace Mr Salil Ankola in the Committee.
More details – https://t.co/TcS0QRCYRT
— BCCI (@BCCI) September 3, 2024
अजय रात्रा यांची भूमिका काय असेल?
निवडकर्ता म्हणून अजय रात्रा निवड समितीच्या इतर चार सदस्यांसोबत मिळून काम करतील. हे सर्व सदस्य नवीन प्रतिभा शोधण्यासाठी एकत्र काम करतील जे भविष्यात टीम इंडियाच्या जबाबदाऱ्या हाताळताना दिसतील. रात्रा यांना कोचिंगचा खूप अनुभव आहे. आसाम, उत्तर प्रदेश आणि पंजाब संघांचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान ते टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्येही दिसले होते.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेने सुरू होऊ शकतो कार्यकाळ…
सप्टेंबर महिन्यात भारत बांगलादेश संघाचे यजमानपद भूषवणार आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी आणि 3 टी-20 सामने खेळवले जातील. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या निवडीत अजय रात्रा महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. त्यानंतर भारताला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी न्यूझीलंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियासोबत खेळायची आहे. त्यानंतर भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत बॉर्डर-गावस्कर मालिका खेळायची आहे.