मुलाच्या अटकेचा विषय काढताच अजय मिश्रा पत्रकारावर भडकले

लखीमपुर खेरी – गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी आज एका पत्रकारावरच आपला राग काढत त्याला चोर असे संबोधले आणि त्याला त्यांनी शिवीगाळही केली. तसेच त्याच्याकडील माईकही त्यांनी हिसकावण्याचा प्रकार आज उत्तरप्रदेशतील लखीमपुर खेरीत घडला.
अजय मिश्रा हे या गावात एका ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. तेथून परत जात असताना ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांच्या अटकेतील मुलाविषयी प्रश्न विचारला असता ते एकदम उखडले.
मुर्खा सारखे प्रश्न विचारू नको, तुम्हारा दिमाख खराब है क्या बे असा जाब संबंधीत पत्रकाराला विचारत त्यांनी त्याला शिवीगाळही केली. माईक बंद करो असे त्या पत्रकाराला धमकावत त्यांनी त्याचा माईकही हिसकाऊन घेण्याचा प्रयत्न केला.
अजय मिश्रा यांच्या बडतर्फीच्या मागणीवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ करून तेथील कामकाज रोखले आहे.





