जिओच्या नेटवर्कवर बिग बी भडकले: पोस्ट लिहित लगावला टोला म्हणाले..

Amitabh Bachchan | बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन अनेकदा आपल्या ब्लॉगवर अनेक गोष्टी आणि किस्से नेहमी शेअर करत असतात. यासोबतच ते काही मुद्द्यांवर आपले प्ररखड मत व्यक्त करत असतात. त्यांनी रियालन्स जिओच्या नेटवर्कबद्दल आणि मिळणाऱ्या सेवांबद्दल प्रश्न उपस्थित केला असून नेटवर्कमध्ये वारंवार होणाऱ्या समस्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये जिओच्या सेवेवर प्रश्न उपस्थित करत ‘अहो जिओ लोकांनो, जरा दया करा. असे म्हटले आहे. मध्यरात्री जवळ आली की, तुमचे नेटवर्क बंद होते. आता आम्ही रात्री कामावर जाणार आहोत. मोठा त्रास होतो. या पोस्टच्या माध्यमातून अमिताभ यांनी जिओ नेटवर्कच्या अनियमित सेवेचा सामना करत असलेल्या लाखो वापरकर्त्यांच्या समस्यांना तोंड दिले आहे. बीग बी अनेकदा त्यांच्या ब्लॉग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधत असतात. पण जिओ नेटवर्कची ही समस्या त्यांच्यासाठी अडचणीची ठरली आहे.
बिग बी यांनी याविषयी आपले प्ररखड मत मांडल्यानंतर आता सोशल मीडियावर त्यांच्या विधानाची चर्चा केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिओच्या नेटवर्कला आउटेज इंटरनेट स्पीड कमी भेटत आहे. आता अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टमधली रंजक गोष्ट म्हणजे दोन दिवसांनंतर 5 एप्रिलला रामनवमीच्या मुहूर्तावर अमिताभ जिओ-हॉटस्टारच्या एका खास कार्यक्रमात रामकथा सांगणार आहेत. अमिताभ बच्चन हे त्यांच्या व्यस्त वेळापत्रकासाठी आणि रात्री काम करण्याची सवय यासाठी ओळखले जातात. या कार्यक्रमात अयोध्या आणि चित्रकूट येथून आरती आणि विधींचे थेट प्रक्षेपणही होणार आहे.





