अजयनं दिल्या चाहत्यांना महाशिवरात्रीच्या खास शुभेच्छा; सांगितला ‘भोला’च्या सेटवरचा थरारक अनुभव

मुंबई – आज देशात महाशिवरात्री उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सणानिमित्त देशात सकाळपासून मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. भाविकांकडून शिवमंदिरात शिवलिंगावर बेलपत्र आणि दूध-पाण्याचा अभिषेक करण्यात येत आहे. या निमित्ताने ठिकठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, याच पवित्र दिवसाचे औचित्य साधत बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने देखील आपल्या सोशल मीडियावर आकाउंटवर स्वतःचे काही फोटो शेअर करत सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेता शिवलिंगाला जल अर्पण करताना आणि पुजाऱ्यासोबत गंगा आरती करत असल्याचं दिसून येत आहे. त्याच्या पाठीमागेही भाविकांची मोठी गर्दीही दिसून येते. यात संपूर्ण गंगा घाटाचे चित्र आहे.
View this post on Instagram
या फोटोला अभिनेत्यानं एक कॅप्शन देखील दिल आहे. “कधीकधी एखादा दिग्दर्शक त्या ‘एका’ची वाट पाहतो, ते म्हणजे अवास्तव, मंत्रमुग्ध करणाऱ्या फ्रेमची… आणि एक दिवस असे घडते. त्या दिवशी मी बनारसमध्ये महाआरतीच्या दृश्याचे शुटिंग करत असताना मला एक जबरदस्त जादू जाणवली. जे केवळ अनुभवता येते..” असं अजय देवगण यानं लिहलं आहे.





