सोन्याच्या सिंहासनावर कडक स्टाईलमध्ये बसलेला फोटो टाकत अजय देवगनने केली चित्रपटाची घोषणा

मुंबई – बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय असलेल्या अजय देवगणच्या आगामी ‘थँक गॉड’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. तरण आदर्शने आज त्याच्या सोशल मीडियावर थँक गॉड चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटात अजय देवगणशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अजय देवगण एकदम रावडी लूकमध्ये दिसत आहे.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अजय काळा चष्मा आणि कोट सूट घातलेल्या अतिशय सुंदर सोन्याच्या सिंहासनावर बसलेला दिसत आहे. तसेच, सिंहासनाच्या मागील बाजूस दोन सिंह जोडलेले आहेत, ज्यामुळे ते आणखी सुंदर दिसत आहे. या चित्रपटात अजय देवगण चित्रगुप्ताची भूमिका साकारत आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून अजय देवगणचा चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज केला. 25 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
AJAY DEVGN: ‘THANK GOD’ FIRST LOOK ARRIVES + TRAILER TOMORROW… Team #ThankGod – starring #AjayDevgn, #SidharthMalhotra and #RakulPreetSingh – unveils #FirstLook of #AjayDevgn from the film… Directed by #IndraKumar… In *cinemas* [Tuesday] 25 Oct 2022 #Diwali. pic.twitter.com/EXdspFDvqw
— taran adarsh (@taran_adarsh) September 8, 2022
अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे पहिल्यांदाच एकत्र ऑनस्क्रीन दिसणार आहेत. तर अजय आणि रकुल तिसऱ्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. याआधी त्यांनी ‘दे दे प्यार दे’ आणि ‘रनवे 34’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात नोरा फतेही देखील दिसणार आहे,





