मुंबई : साऊथची सुपरस्टार काजल अग्रवालने 2004 मध्ये ‘क्यों! हो गया ना…’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती साउथ चित्रपटांमध्ये झळकली. अजय देवगनच्या ‘सिंघम’या चित्रपटातून तिला एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यानंतर आता ती बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खान बरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सिकंदरमध्ये झळकणार काजल अग्रवाल काजल अग्रवालला एक मोठा बॉलिवूड चित्रपट मिळाला आहे. ती आता सुपरस्टार सलमान खानसोबत दिसणार आहे. या अगोदर तिने अजय देवगण आणि अक्षय कुमार सारख्या बॉलीवूडमधील काही मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. आता ती ‘सिकंदर’ या चित्रपटात सलमान खान बरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदानादेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ईदच्या दिवशी सलमान खानने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली होती. दीड वर्षांहून अधिक काळ ब्रेक घेतल्यानंतर सलमान या चित्रपटाद्वारे थिएटरमध्ये परतणार आहे. ‘गजनी’ आणि ‘हॉलिडे: अ सोल्जर नेव्हर ऑफ ड्यूटी’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा ए.आर. मुरुगदास हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.