Ajay Devgn : अभिनेता अजय देवगण त्याच्या ‘दे दे प्यार दे २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असून, आता अजय देवगणच्या पुढच्या चित्रपटाची अपडेट समोर आली आहे. या वर्षात अजय देवगणच्या रेड २ या चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर मोठी कमाई केली. पण त्यानंतर प्रदर्शित झालेल्या सन अॅाफ सरदार २ चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर सपशेल फोल ठरला. त्यामुळे अजय देवगण त्याच्या आगामी चित्रपटातून चाहत्यांंसाठी काही नवे आणणार का असा सवाल चाहत्यांना पडला होता. तर नव्या वर्षात अजय देवगणचे अनेक मोठे चित्रपट येणार आहेत. तूर्तास मिळालेल्या माहितीनुसार, मस्ती ४ मध्ये अजय देवगणचा कॅमिओ पाहायला मिळू शकतो असे सांगण्यात आले आहे. दिग्दर्शक मिलाप झवेरी आणि इंद्र कुमार यांच्याशी त्याचे चांगले संबंध आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या “तेरा यार हूं मैं” चित्रपटाच्या ट्रेलर लॅान्ज सोहळ्याला अजयने हजेरी लावली होती. त्यामुळे मस्ती ४ मध्ये तो एका कॅमिओ रुपात पाहायला मिळणार आहे. रितेश देशमुख, अल्ताफ सिद्धवानी आणि विवेक ओबरॅाय यांची मुख्य भूमिका असलेला मस्ती ४ चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. इंद्र कुमारसोबत अजय देवगण एका कॅामेडी जॅानर चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे नाव धमाल ४ आहे. पुढील वर्षी मार्चमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अजयच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. अजयचे अजून अनेक मोठे चित्रपट अॅानफ्लोअर आहेत, पण त्या चित्रपटांची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. हेही वाचा : दिल्ली बॉम्बस्फोटांना जबाबदार असणाऱ्यांचा हिशोब होणार ; अमित शहा यांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक