Ajay Devgan and Akshay Kumar | अभिनेता अजय देवगण आणि अक्षय कुमार ‘सिंघम अगेन’ चित्रपटात झळकल्यानंतर आता पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. अजय देवगणने एका चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्यात तो स्वत: दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार आहे. एका कार्यक्रमादरम्यान ‘दोघंही मुख्य भूमिकेत दिसतील असा सिनेमा कधी येणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजयने म्हंटले की, “ही अशी गोष्ट आहे ज्याची आम्ही नंतर घोषणा करणार होतो, पण मला वाटते की हे एक उत्तम व्यासपीठ आहे. आम्ही आधीपासूनच एका सिनेमावर काम करत आहोत ज्याचा मी दिग्दर्शक आहे तर अक्षय अभिनेता आहे. याबद्दल आम्ही नंतर सविस्तर सांगू.” Ajay Devgan and Akshay Kumar | अजय देवगण आणि अक्षय कुमार यांचा सिंघम अगेन हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये चांगलाच गाजत आहे. त्यांच्याशिवाय या चित्रपटात रणवीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ आणि दीपिका पदुकोण यांसारखे कलाकार आहेत. या जोडीने यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यामध्ये खाकी, सूर्यवंशी आणि सुहाग यांचा समावेश आहे. Ajay Devgan and Akshay Kumar | तर अजय देवगणचा दिग्दर्शक म्हणून हा पाचवा चित्रपट असेल. अजयने 2008 मध्ये आलेल्या ‘आई, यू, मी और हम’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. यानंतर त्याने 2016 मध्ये ‘शिवाय’ चित्रपट दिग्दर्शित केला. 2012 मध्ये त्याने ‘रनवे 34’ च्या डायरेक्टरची जबाबदारी स्वीकारली. या चित्रपटात अजय आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. दिग्दर्शक म्हणून अजयचा शेवटचा चित्रपट 2023 मध्ये आलेला ‘भोला’ होता, ज्यामध्ये तो तब्बूसोबत दिसला होता. हेही वाचा: जमावाने मुख्यमंत्र्यांच्या जावयासह अनेक आमदारांची घरे पेटवली ; 7 जिल्ह्यांत इंटरनेट बंद, संचारबंदीही लागू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार का भडकला?