अजय देवगणकडे सध्या “मैदान’, “गंगूबाई काठियावाडी’ आणि “आरआरआर’ सारखे सिनेमे आहेत. याशिवाय त्याच्याकडे यशराज बॅनरचा एक बिग बजेट सिनेमाही आला होता.
View this post on Instagram
मात्र, आश्चर्य म्हणजे अजयने हा सिनेमा चक्क नाकारला आहे. हा सिनेमा एका सुपर हिरोवर आधारलेला आहे आणि त्याचे बजेट तब्बल 180 कोटी रुपये होते. या सिनेमामध्ये अजयला व्हिलनचा रोल करायचा होता.
View this post on Instagram
आदित्य चोप्राच्या प्रॉडक्शनखाली होणाऱ्या या महत्त्वाच्या सिनेमात काम करण्याची संधी अजयने स्वतःहून नाकारली. त्यामागील खरे कारण म्हणजे अन्य काही नसून तारखा उपलब्ध नसणे हे होते.
View this post on Instagram
अजयने हा सिनेमा नाकारल्यावर आदित्य चोप्राने या सिनेमासाठी अन्य कोणा ऍक्टरला घेण्याऐवजी हा सिनेमाच थांबवला आहे. अजयबरोबरच हा सिनेमा करायचे असे ठरवले असल्याने जेव्हा अजयला पुरेसा वेळ असेल, तेव्हा तो हा सिनेमा करणार आहे.