अजय देवगण आणि तब्बूचा ‘औरो में कहा दम था’ चित्रपट ओटीटीवर रिलीज

Auron Mein Kahan Dum Tha | अभिनेता अजय देवगण आणि तब्बू यांच्या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांचा’औरो में कहा दम था’ हा चित्रपट या वर्षी रिलीज झाला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवण्यात अपयशी ठरला. यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज होणार आहे. त्यामुळे आता अजय – तब्बूच्या चाहत्यांना हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे.
अजय देवगणचा ‘औरों में कहां दम था’ हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. प्राइम व्हिडिओने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे.
View this post on Instagram
प्राइम व्हिडिओने या पोस्टमध्ये चित्रपटाच्या संपूर्ण स्टार कास्टला देखील टॅग केले आहे. ही पोस्ट अपलोड होताच सोशल मीडियावर व्हायरल झाली. हे पाहून चाहतेही चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. 27 सप्टेंबरपासून तुम्ही घरबसल्या ‘औरो में कहा दम था’ चित्रपट पाहू शकता.
‘औरों में कहाँ दम था’ च्या कथेबद्दल बोलायचे झाले तर,ही एक प्रेमकथा आहे. ज्यामध्ये अजय आणि तब्बू अनेक वर्षांनंतर एकमेकांना लग्न करताना दिसले होते. चित्रपटात दोघेही 22 वर्षांपासून एकमेकांपासून दूर राहतात, त्यानंतर संपूर्ण कथा या दोघांभोवती फिरते. या चित्रपटात अजय-तब्बूशिवाय शंतनू माहेश्वरी, सई मांजरेकर आणि जिमी शेरगिल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
दरम्यान, अजय देवगण आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका असलेला नीरज पांडे यांचा ‘औरों में कहां दम था’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या चित्रपटाने केवळ 12.91 कोटी रुपयांची कमाई केली.





