ऐश्वर्या शर्माने ट्रोल करणाऱ्यांना सुनावले

Aishwarya Sharma | सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. परंतु काही जण याकडे दुर्लक्ष करतात. तर काही जण ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देतात. बिग बॉस 17 फेम ऐश्वर्या शर्माला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र तिनेही एक व्हिडिओ शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या म्हणते, “नमस्कार मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. प्रत्येकाला खोटे बोलणारे लोक आवडतात आणि सरळ तोंडावर सत्य बोलणारे लोक त्यांना वाईट वाटतात. मी देखील त्यांच्यापैकी एक आहे, जी खरे बोलून वाईट होते. आज पुन्हा एकदा मी खूप वाईट बोलणार आहे आणि तुम्हा सर्वांना या गोष्टी ऐकाव्या लागतील. तुम्हा सर्वांना माझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवायचे आहे. तुम्ही मला नेहमी संदेश देता की, मी असे करू नये, मी हे केले पाहिजे, मी कोणाशी कसे बोलावे, मी कोणाशी कसे बोलू नये. पण मी तुमच्या या सर्व गोष्टी ऐकणार नाही. ”
View this post on Instagram
ऐश्वर्या पुढे म्हणाली, “तुम्ही माझे बिल भरत नाही आणि तुम्ही माझे बिल भरले तरी मी तुमच्याकडून अशा वाईट गोष्टी ऐकणार नाही. जर मी तुझ्यासारखे वागू लागले तर मी देखील ट्रोलर होईल. मग तुझ्यात आणि माझ्यात फरक राहणार नाही तुमच्याप्रमाणे मी माझ्या प्रोफाईलवरून डीपी काढून किंवा बनावट सोशल मीडिया प्रोफाइल बनवूनकोणाचाही गैरवापर करणार नाही. मी आहे तशी मला राहू द्या. मी तुम्हाला बदलायला सांगत नाही आणि मलाही बदलण्याचा प्रयत्न करू नका,” असे म्हणत ऐश्वर्याने ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे.
दरम्यान, ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेत ऐश्वर्या शर्माची नील भट्टसोबत भेट झाली. त्यानंतर त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाली आणि त्यांनी लग्न केले. त्यानंतर दोघांनी बिग बॉसच्या घरात सहभाग घेतला होता.





