रोममध्ये वाढदिवस साजरा करून ‘ऐश्वर्या’ भारतात परतली
Updated On:

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नुकताच रोममध्ये तिचा वाढदिवस करून भारतात परतली आहे. 1 नोव्हेंबरला ऐश्वर्याचा वाढदिवस झाला. रोममध्ये ऐश्वर्याने पती अभिनेता अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत तिचा वाढदिवस साजरा केला. मुंबईतील विमानतळावर या सगळ्यांना स्पॉट केल गेल.
यावेळी ऐश्वर्याने काळ्या रंगाचा टॉप आणि जीन्स घातली होती, ज्यामध्ये ती सुंदर दिसत होती. तिच्यासोबत आराध्या होती, ती सुद्धा ट्रॅकसूटमध्ये छान दिसत होती. रोममध्ये ऐश्वर्या तिच्या एका फॅशनशोसाठी गेली होती.





