मुंबई : स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर मंगेशकर यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. अनेक कलाकरांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने केलेल्या पोस्टमुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लता मंगेशकर यांचा फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली होती. तिने ‘माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. तुमच्या आत्म्याला शांती मिळो’ या आशयाचे कॅप्शन दिले होते. पण ऐश्वर्याने उशिरा पोस्ट केल्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी कमेंट करत ‘आता आठवण झाली का?’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘इतक्या उशिरा का पोस्ट केली आहेस’ असे म्हटले आहे. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला ट्रोल केले आहे.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यासोबत त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. लता मंगेशकर यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली. ७ फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.