Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चनचा ‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये रॉयल अंदाज
Aishwarya Rai Bachchan: पॅरिस फॅशन वीकदरम्यान आयोजित ‘लोरियाल पॅरिस’च्या इव्हेंटमध्ये ऐश्वर्याने आयफेल टॉवरसमोर रॅम्प वॉक केला.

Aishwarya Rai Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पॅरिसमध्ये आयोजित एका भव्य फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी ती रॉयल लुकमध्ये पाहायला मिळाली. तिच्या दमदार रॅम्प वॉकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ऐश्वर्याला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची चांगलीच गर्दी जमली होती.
यावेळी ५२ वर्षांची ऐश्वर्या अत्यंत रुबाबदार अंदाजात दिसून आली. या कार्यक्रमात ऐश्वर्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेले कलाकारही सहभागी झाले होते. ऐश्वर्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला.
Once a Queen, Forever a Queen #AishwaryaRaiBachchan
Video Courtesy : Siddarth pic.twitter.com/6kco85FNuN
— Groovy (@BibaswanM) September 28, 2026
पॅरिस फॅशन वीकदरम्यान आयोजित ‘लोरियाल पॅरिस’च्या इव्हेंटमध्ये ऐश्वर्याने आयफेल टॉवरसमोर रॅम्प वॉक केला. या भारतीय सौंदर्यवतीला पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाची नजर तिच्यावरच खिळली. ऐश्वर्याने ग्लॅमरस अदा दाखवत कॅमेरासाठी पोज देऊन उपस्थितांची मनं जिंकली.
ऐश्वर्या राय बच्चनने परिधान केलेला हा गाऊन यारा शोमेकर या डिझायनरने बनवला होता. ऐश्वर्यासोबत सिमोन ऐश्ली, वियोला डेविस, जेन फोंडा आणि सेलीन डियोन हे सेलिब्रिटीही या इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते.





