Aishwarya Rai & Abhishek Bachchan: ‘Baby पप्पा…’ अभिषेक बच्चनचा ५० वा वाढदिवस; ऐश्वर्या रायची खास पोस्ट व्हायरल
Aishwarya Rai & Abhishek Bachchan: बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन, ५ फेब्रुवारी रोजी, आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी संपूर्ण चित्रपटसृष्टीतून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पत्नी ऐश्वर्या राय बच्चन हिनेही एक खास आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

ऐश्वर्याने अभिषेकचा बालपणीचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये अभिषेकचा उल्लेख ‘Baby Papa’ असा करत त्याचं वयही सांगितलं. तिच्या पोस्टमध्ये ती लिहिते, “५० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डिअर Baby Papa… तुला भरपूर प्रेम, शांती, आनंद, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभो. कायम आनंदी राहा.”

Abhishek Bachchan Aishwarya Rai
अभिषेक बच्चनचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ रोजी झाला असून, तो ५० वर्षांचा झाला आहे. ऐश्वर्याची ही पोस्ट समोर येताच चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “खूपच गोड फोटो आहे”, “कॅप्शन फारच सुंदर आहे”, “तुम्ही दोघं कायम आनंदी राहा” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
View this post on Instagram
ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा विवाह २००७ मध्ये झाला होता. २०११ मध्ये त्यांच्या आयुष्यात आराध्याचं आगमन झालं. हे तिघंही कुटुंब म्हणून नेहमीच चर्चेत असतात आणि काही दिवसांपूर्वी ते ख्रिसमस सुट्टीसाठी परदेशात फिरायला गेले होते.
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, अभिषेकने २००० साली ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. आता तो लवकरच शाहरुख खानसोबत ‘किंग’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. तर ऐश्वर्या राय शेवटची मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन २’ या चित्रपटात दिसली होती.