“तरी नवरा हाच पाहिजे” असं लिहत ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला ‘खास’ व्हिडिओ

Aishwarya Narkar । मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. याशिवाय त्या सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. अनेक व्हिडिओ आणि फोटो त्या सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात.
सोशल मीडियावरील पोस्टमुळे त्यांना अनेकदा ट्रोलही केले जाते. अशात नुकतीच वटपौर्णिमा साजरी केली गेली. अनेक मराठी अभिनेत्रींनी आपल्या पतीसाठी उपवास करून ही वटपौर्णिमा साजरी केली आहे आणि या खास दिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याच निमित्याने ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या पतीला अगदी वेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
ऐश्वर्या नारकर यांनी पती अविनाश यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघं एकमेकांशी बॉक्सिंग करताना दिसतायत. हा एक मजेशीर रीलचाच भाग आहे. यात मजेशीर रीलमध्ये अविनाश यांच्याकडून टुकून ऐश्वर्या यांच्या डोळ्याला मार लागतो. या व्हिडीओला कॅप्शन देत ऐश्वर्या नारकर यांनी लिहिलं, “तरी नवरा हाच पाहिजे”
तर या व्हिडीओला कॅप्शन देत ऐश्वर्या नारकर यांनी लिहिलं, “वट- पौर्णिमेच्या शुभेच्छा.” वटपौर्णिमेच्या निमित्ताने हा मजेशीर व्हिडीओ शेअर केल्याने दोघांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या कपलच्या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स आल्या आहेत. दरम्यान, ऐश्वर्या नारकर व त्यांचे पती अविनाश नारकर हे मराठी अभिनयसृष्टीतील लोकप्रिय जोडपं आहे. दोघेही त्यांचे फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. यावरून अनेकदा अविनाश नारकर यांना देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते.





