ऐश्वर्या आणि आराध्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी ‘या’ कारणामुळे केले ट्रोल

Aishwarya Rai And Aaradhya | अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र या अफवांच्या दरम्यान दोघेही त्यांची मुलगी आराध्याच्या शाळेच्या कार्यक्रमात एकत्र पहायला मिळाले होते. यामुळे घटस्फोटाच्या चर्चा फक्त अफवा असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर ऐश्वर्या आणि लेक आराध्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई विमानतळाबाहेर ऐश्वर्या राय आणि आराध्या पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या. दोघी मायलेकी विदेशात जाताना दिसत आहेत. यावेळी यांच्यासोबत अभिषेक बच्चन हा दिसत नाही. यावेळी आई आणि मुलीने विमानतळासाठी कॅज्युअल काळ्या रंगाचे पोशाख परिधान केले होते. यावरून ऐश्वर्यावर काहींनी टीका केली आहे. Aishwarya Rai And Aaradhya |
या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी लिहिले की, दरवेळी अभिषेक बच्चन हा तुमच्यासोबत का नसतो?, पुन्हा काळा रंग, तो फक्त स्वतःच नाही तर मुलीला देखील काळ्या रंगाचा ड्रेस घालण्यास सांगितला. Aishwarya Rai And Aaradhya |
View this post on Instagram
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये अधिक दिसते. आराध्या बच्चन हिच्या शाळेतील फंक्शनमध्येही ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आली होती. आताही विमानतळावर ऐश्वर्या ही काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये पोहोचली.
दरम्यान, 20 डिसेंबर रोजी अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऐश्वर्या राय आपली मुलगी आराध्याला चिअर करण्यासाठी पती अभिषेक बच्चन आणि सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत आली होती. तिघांनाही एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. या कार्यक्रमातील ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ऐश्वर्या मोबाइल फोनवर तिच्या मुलीच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ काढताना दिसत होती. Aishwarya Rai And Aaradhya |
हेही वाचा:





