Air travel : एकाच दिवसात पाच लाख नागरिकांचा विमान प्रवास

मुंबई – मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे कंपन्यांची विक्री कमी झाली आहे, असे बोलले जात असतानाच विमानाने प्रवास करणार्यांची संख्या मात्र वेगाने वाढत आहे.
17 नोव्हेंबर रोजी भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्राने नवा विक्रम केला. या दिवशी तब्बल 5,05412 नागरिकांनी विमान प्रवास केला. या दिवशी तब्बल 3,173 देशांतर्गत उड्डाने झाली. गेल्या दोन आठवड्यापासून विमानाने प्रवास करणार्यांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे या काळात कोणतेही सण नव्हते.
गेल्या तिमाहीत भारतातील सर्वात मोठे विमान कंपनी असलेल्या इंडिगोसह विविध कंपन्यांच्या ताळेबंदावर परिणाम झाला आहे. आता विमान प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या कंपन्यांचे ताळेबंद सुधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या कंपन्यांना महाग इंधनाचा सामना करावा लागतो.
आता एअर इंडियाची कार्यक्षमता वाढणार आहे. कारण या कंपनीकडे जास्त प्रमाणात विमाने आली आहेत. असे असले तरी बर्याच विमान कंपन्यांना सुट्या भागाचा आणि देखभालीच्या प्रश्नाचा सामना करावा लागत आहे.





