IAF: एअर मार्शल एपी सिंग बनले हवाई दलाचे नवे प्रमुख

नवी दिल्ली – एअर मार्शल एपी सिंग यांनी भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांना एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी पदभार सोपवला. आज एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी सकाळी वायु भवन येथे पारंपारिक ‘वॉक थ्रू’ करण्यापूर्वी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे दिवंगत वीरांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांना हवाई दलाच्या हवाई योद्धांनी निरोप म्हणून औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
Air Chief Marshal VR Chaudhari handed over command of #IndianAirForce today. On the occasion, he paid homage to the departed brave hearts at the #NationalWarMemorial in the morning before undertaking the traditional ‘walk through’ at the Vayu Bhawan. He was presented a… pic.twitter.com/FlmA6BIqfj
— Indian Air Force (@IAF_MCC) September 30, 2024
एपी सिंग यांनी ही महत्त्वाची पदे भूषवली –
आपल्या कारकिर्दीत, एपी सिंग यांनी ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन आणि फ्रंटलाइन एअर बेसचे नेतृत्व केले आहे. चाचणी पायलट म्हणून, त्यांनी मॉस्को, रशिया येथे MiG-29 अपग्रेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमचे नेतृत्व केले. ते राष्ट्रीय उड्डाण चाचणी केंद्रात प्रकल्प संचालक (उड्डाण चाचणी) देखील होते आणि त्यांच्याकडे तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या उड्डाण चाचणीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी साउथ वेस्टर्न एअर कमांडमध्ये एअर डिफेन्स कमांडर आणि इस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. हवाई मुख्यालयात जाण्यापूर्वी ते सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ देखील होते.




