‘एअर इंडिया’ कडून माहात्मा गांधींचे खास पोट्रेट
Updated On:

नवी दिल्ली – आज संपूर्ण देशभरात राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांची 150वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. देशातील सर्वच स्तरातून महात्मा गांधींना श्रद्धांजली दिली जात आहे.
दरम्यान, भारतीय विमान कंपनी ‘एअर इंडिया’ने देखील गांधींना अनोख्या अंदाजात श्रद्धांजली दिली. ‘एयर इंडिया’ने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एयरबस 320 च्या (Airbus 320) टेलवर महात्मा गांधी यांचे पोट्रेट पेन्ट करुन त्यांना श्रद्धांजली दिली आहे.
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची 116वी जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने देशभरात अनेक ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.





