Air India: मदुराईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, चेन्नई विमानतळावर परतले

नवी दिल्ली – चेन्नईहून मदुराईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमानाला चेन्नई विमानतळावर परतावे लागले. यावेळी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान सुरक्षितपणे उतरले. ज्या प्रवाशांनी फ्लाइटमध्ये तिकीट काढले होते. त्यांना प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था देण्यात आली.
चेन्नईहून मदुराईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI671 विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाली. त्यामुळे विमानाला चेन्नई विमानतळावर परतावे लागले. एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार, विमानाने चाचणीसाठी चेन्नई विमानतळावर सुरक्षित आणि सामान्य लँडिंग केले. येथे एअरलाइन्स असोसिएट्सने गैरसोय कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. तसेच प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.
एअर इंडियाच्या अधिका-यांनी सांगितले की, प्रवाशांची इच्छा असल्यास, प्रवास रद्द केल्यावर पूर्ण परतावा मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याआधी शुक्रवारी तिरुअनंतपुरममध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात उड्डाण करताना संशयास्पद धूर दिसला होता. विमान तिरुवनंतपुरम विमानतळावर परतले. एअरलाइन्सनुसार, विमान मस्कतला जात होते. विमानात 142 प्रवासी होते. तपासादरम्यान प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले.





