Air India plane : दिल्लीत एअर इंडियाच्या विमानाला आग; नेमकं काय घडलं, पाहा…

Air India plane – दिल्ली विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याची घटना आज घडली. हे विमान हाँगकाँगहून दिल्ली विमानतळावर उतरताच विमानाच्या ऑक्झिलरी पॉवर युनिट (एपीयू) ला आग लागली. सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मंगळवारी हाँगकाँगहून दिल्लीला जाणारी फ्लाइट क्रमांक एआय ३१५ ही विमान उतरल्यानंतर आणि गेटवर पार्क केल्यानंतर लगेचच ऑक्झिलरी पॉवर युनिट (एपीयू) मध्ये आग लागली. प्रवाशांनी उतरण्यास सुरुवात केली तेव्हा ही घटना घडली. आग लागताच सिस्टम डिझाइननुसार एपीयू आपोआप बंद झाला.
आगीमुळे विमानाचे काही नुकसान झाले आहे. तथापि, प्रवासी आणि कर्मचारी सामान्यपणे उतरले आहेत आणि ते सुरक्षित आहेत. पुढील चौकशीसाठी विमान थांबवण्यात आले आहे आणि आगीबद्दल रेग्युलेटरला माहिती देण्यात आली आहे.





