Air india : १२ जून रोजी अहमदाबाद–लंडन एअर इंडिया दुर्घटनेचे सावट अजूनही हटले नव्हते, तोच १४ जूनला दिल्लीहून व्हिएन्ना जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-187 या विमानात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. टेकऑफनंतर काही क्षणांतच विमान ९०० फूट खोल कोसळले. सुदैवाने, वैमानिकाने प्रसंगावधान राखून मोठा अनर्थ टळवला. टेकऑफनंतर सुरू झाला थरार… दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून AI-187 हे बोईंग 777 विमान पहाटे 2:56 वाजता उड्डाण करताच काही मिनिटांत विमान धोकादायकरीत्या खाली घसरू लागले. त्याचवेळी, कॉकपिटमध्ये ग्राउंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टम (GPWS) चा गंभीर इशारा – “Don’t Sink!” व ‘स्टॉल वॉर्निंग’ सुरू झाली. त्यानंतर त्याला तांत्रिक बिघाड लक्षात आला. पायलटचे प्रसंगावधान आणि प्रवाशांचे प्राण वाचले : या थरारक क्षणांत पायलटने लगेच विमानाचे नियंत्रण सांभाळत त्याला पुन्हा सुरक्षित उंचीवर नेले. प्रवासी आणि क्रू सुखरूप राहिले आणि ९ तास ८ मिनिटांच्या प्रवासानंतर विमान सुरक्षित व्हिएन्नामध्ये उतरले. डीजीसीएने तपास सुरू केला : सुरुवातीला वैमानिकाच्या अहवालात फक्त “टर्ब्युलन्समुळे अलार्म वाजला” असे नमूद केले होते. मात्र, फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) च्या तपासणीत GPWS, ‘Don’t Sink’ आणि ‘Stall Warning’ यासारखे गंभीर इशारे नोंदवले गेले. दरम्यान, एअर इंडियाने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हे प्रकरण DGCAकडे सादर करण्यात आले आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार, दोन्ही वैमानिकांना तपास पूर्ण होईपर्यंत ड्युटीवरून हटवण्यात आले आहे.” १२ जूनचा हादरा अजून ताजा : हे लक्षात घेण्यासारखे आहे की काही दिवसांपूर्वीच, १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले होते. त्यात २७५ जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर DGCAने विमान कंपन्यांना विशेष सुरक्षा मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या होत्या.