2022 पर्यंत लसीकरण पूर्ण करावे; बोरिस जॉन्सन यांचे “जी-7′ गटातील देशांना आवाहन

लंडन – करोनाविरोधी लसीकरण 2022 पर्यत पूर्ण करण्याच्याबाबत आपली कटिबद्धता दाखवावी, असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी “जी-7′ गटातील देशांना केले.
“जी-7’च्या बैठकीमध्ये लसींचा पुरवठा, तसींच्या उपलब्धतेला सहाय्य, वातावरण बदल आणि शाळांमध्ये अधिकाधिक मुलांचा सहभाग ही मध्यवर्ती संकल्पना होती. या बैठकीला अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण होते.
पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीमध्ये कोविड पश्चात स्थितीबाबतचे उद्दिष्ट निश्चित करायचे आहे. त्यासाठी 2022 पर्यंत लसीकरण पूर्ण करण्याबाबतटी कटिबद्धता हवी असे जॉन्सन यांनी सांगितले. गरीब देशांना ब्रिटनकडून मदतीचा हात दिला जाईल अशी ग्वाहीहीो त्यांनी दिली.
ऑक्सफोर्डच्या ऍस्ट्रॅजेनेका लसच्या विकासासाठी आणि उत्पादनास ब्रिटनकडून
अर्थसहाय्य दिले आणि याची हमी दिली की ती जगभरात उपलब्ध करुन दिली जाईल.




