एम्समध्ये आयसोलेट वॉर्ड
Updated On:

नवी दिल्ली : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (एम्स) विलगता कक्ष सुरू करण्यात आला आहे. नोव्हेल कोरोनस या विषाणूंच्या संभाव्य संसर्गाची भीती लक्षात घेऊन ही उपाय योजना करण्यात आली.
एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले, आम्ही विलगता कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) सुरू केला आहे. कोरोना विषाणू बाधीत रूग्णांवर तेथे उपचार करण्यात येतील.
बाधीतांवर उपचार करताना कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून योग्य त्या वैद्यकीय उपाय योजना करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.





