Political News : मोठा राजकीय भूकंप..! ४ आमदारांचे तडकाफडकी राजीनामे; प्रस्थापित राजकीय पक्षाला जोरदार झटका
Political News : राजकारणात सत्तापालट झाल्यानंतर आता अत्यंत वेगवान आणि नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

Political News : तमिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकार सत्तेत आल्यानंतर पक्षाची ताकद सातत्याने वाढत असून आता एआयएडीएमकेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या चार आमदारांनी तडकाफडकी राजीनामे दिले असून त्यापैकी तीन आमदारांनी टीव्हीके पक्षात प्रवेश केला आहे. (Political News)
या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष जेसीडी प्रभाकर यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले आहेत. राजीनामा दिलेल्या आमदारांनी आगामी पोटनिवडणुका टीव्हीकेच्या चिन्हावर लढवण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एआयएडीएमके प्रमुख पलानीस्वामी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Political News)
दरम्यान, एआयएडीएमकेमधील बंडखोर आमदारांची संख्या आता १७ वर पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काळात आणखी काही आमदार राजीनामे देत टीव्हीकेत प्रवेश करू शकतात. हे आमदारही टीव्हीकेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. (Political News)
या घडामोडींमुळे मुख्यमंत्री विजय यांची राजकीय ताकद अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. सध्या टीव्हीकेकडे १०७ आमदार असून, बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यामुळे विजय सरकारला स्पष्ट बहुमत मिळवणे सोपे होऊ शकते. (Political News)
दुसरीकडे, एआयएडीएमकेने या बंडखोर आमदारांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगत त्यांच्या राजीनाम्यांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. पक्षविरोधी कारवायांची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राजीनामे नामंजूर ठेवावेत, असे पत्र एआयएडीएमकेकडून देण्यात आले आहे. (Political News)
तत्पूर्वी, नुकत्याच झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीके पक्षाने १०८ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला होता. टीव्हीकेने अन्य पक्षांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली होती. तर डीएमकेला ५९ आणि एआयएडीएमकेला ४७ जागांवर विजय मिळाला होता. (Political News)





