गुगल भारतात पहिले AI हब बनवणार, तब्बल ‘एवढे’ अब्ज डॉलर्सची करणार गुंतवणूक ; सुंदर पिचाई यांची घोषणा

AI Hub in India। गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आज भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) हब स्थापन करण्याची मोठी घोषणा घोषणा केली. या उपक्रमासाठी कंपनी १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. पिचाई यांनी यावेळी,”त्यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली असल्याचे सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम याठिकाणी एक मोठे डेटा सेंटर आणि एआय हब एका विशिष्ट योजनेसह बांधले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
सुंदर पिचाई यांनी गुगल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दल एक पोस्ट देखील शेअर केली. त्यात त्यांनी, “भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणे हा एक अद्भुत अनुभव होता. आम्ही विशाखापट्टणम येथे बांधल्या जाणाऱ्या गुगलच्या पहिल्या एआय हबची योजना शेअर केली. हे एक ऐतिहासिक पाऊल असेल. या हबमध्ये गिगावॅट-स्केल संगणकीय क्षमता, एक नवीन आंतरराष्ट्रीय सबसी गेटवे आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा पायाभूत सुविधांचा समावेश असेल.” असे म्हटले आहे.
गुगलची भारतात १,३३१.८५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक AI Hub in India।
गुगल भारतात १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. हे देशासाठी जॅकपॉटपेक्षा कमी नाही. याचा भारताला मोठा फायदा होणार आहे. जर हे १५ अब्ज डॉलर्स भारतीय चलनात रूपांतरित केले तर ते १,३३१.८५ अब्ज रुपये होईल.
Great to speak with India PM @narendramodi @OfficialINDIAai to share our plans for the first-ever Google AI hub in Visakhapatnam, a landmark development.
This hub combines gigawatt-scale compute capacity, a new international subsea gateway, and large-scale energy infrastructure.…
— Sundar Pichai (@sundarpichai) October 14, 2025
गुगल क्लाउडचे सीईओ एआय हबबद्दल काय म्हणाले? AI Hub in India।
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, गुगलच्या एका कार्यक्रमात गुगल क्लाउडचे सीईओ थॉमस कुरियन म्हणाले की हे नवीन एआय हब एआय पायाभूत सुविधा, नवीन डेटा सेंटर क्षमता, मोठे उर्जा स्रोत आणि विस्तारित ऑप्टिकल फायबर नेटवर्क एकत्रित करेल. कुरियन म्हणाले, “विशाखापट्टणममध्ये एआय सेंटर स्थापन करण्यासाठी पुढील पाच वर्षांत आम्ही १५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहोत.”
हे गुगलचे पहिले एआय हब असेल. ते भारतीय एआय अभियंत्यांनाही संधी प्रदान करेल. कार्यक्रमादरम्यान थॉमस कुरियन यांनी सांगितले की गुगल गेल्या २१ वर्षांपासून भारतात काम करत आहे आणि १४,००० हून अधिक भारतीय त्याच्याशी जोडलेले आहेत.





