राहुरी – वाद मिटवण्यासाठी गेलेल्या इसमाला दगड, काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विजय दगडू ढूस (वय ५०, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आरोपी हे शोभा रामदास भालके यांचेसोबत वाद घालत होते. तेव्हा विजय ढूस यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यांना दगड, काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शोभा रामदास भालके या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता आरोपीने त्यांना देखील काठी व लाथाबुक्यांनी मारहाण केली.त्यांचे गळ्यातील सोन्याचा पत्ता व मनी बळजबरीने तोडून खिशात टाकले. त्यानंतर घराच्या दरवाजावर दगड मारून दरवाजाची काच फोडून नुकसान केले. विजय ढूस हे मारहाणीत जखमी झाले न त्यांच्यावर राहुरी येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरुन आरोपी वेदांत उर्फ बाबु सजन साह, जिशान रमाम पिंजारी, अरबाज शब्बीर शेख तसेच निशान (पुर्ण नाव व गाव माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.