आरक्षणाचा मुद्दा भावनिक बनवता येणार नाही : विखे

नगर – मराठा आरक्षणाचा मुद्दा समाजासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा बनला असून या मुद्द्याला भावनिक करून चालणार नाही. असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
सावेडी येथील महसुल भवन, या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपुजन पालकमंत्री विखे यांच्या हस्ते आज (दि.14) करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. आरक्षणासाठी आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये जे निर्णय सरकार करतात ते निर्णय न्यायालय मध्ये टिकणे, न्यायालयाची त्याला मान्यता असणे गरजेचे आहे.
न्यायालयाने 51 टक्क्यांची जी मर्यादा घातली आहे. ती आपल्याला ओलांडता येत नाही. मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्यावे त्यासाठी सभा सुरू आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत अन्य समाज देखील आरक्षण मागतोय यामधून आणखी संघर्ष वाढतो आहे. मात्र कायद्याच्या चौकटीत टिकेल असा आरक्षण दिलं पाहिजे. जरांगे तसेच अन्य मंडळी देखील प्रयत्न करत आहेत.





