अहमदनगर । शिंगवे तुकाई येथे चाकूच्या हल्ल्यात एक जखमी
Updated On:

सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सोनई – डंपर हळू चालवत जा असे सांगितल्याचा राग येंऊन शिंगवे तुकाई येथे पोटात चाकू खुपसून एकास जखमी करण्याची घटना घडली. मंगल संजय होंडे (रा. शिंगवेतुकाई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यांचे पती संजय जनार्धन होंडे यांनी नातू हा नेहमी बाहेर अंगणात खेळत असल्याने डंपर हळू चालवत जा, असे सांगितले होते.
त्याचा राग मनात धरून आरोपी आकाश संजय येळवंडे (रा. घोडेगाव), ज्ञानेश्वर मच्छिंद्र पुंड , अविनाश एकनाथ विरदकर, मोहित सुनील होंडे (सर्व रा. शिंगवेतुकाई) यांनी संजय होंडे यांच्या पोटात चाकूने वार करत जखमी केले. त्यानुसार आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष शेळके करत आहे.





