Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात पावसाचे तांडव ! भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

– अलताफ शेख (प्रतिनिधी)
अकोले – अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर, रतनवाडी परिसरात पावसाचे तांडव सुरु असुन २४ तासात घाटघरला ३४५ मी.मी.,रतनवाडी ३२६ मी.मी.व पांजरे ला ३१५ मी.मी.एवढा उच्चांकी पाऊस झाला आहे.
२४ तासात १ टी.एम.सी पेक्षा अधिक १२३५ द.ल.घ.फु नविन पाण्याची आवक भंडारदरा धरणात होऊन भंडारदरा धरण ७५ टक्के तर निळवंडे धरण ३६ टक्के भरले आहे .
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने ओढे, नाले, धबधबे कोसळत आहे. नेकलेस फॅाल, नान्ही फॅाल, पांजरे फॅाल, सह सर्व धबधबे कोसळु लागले आहे. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढु लागली आहे.
भंडारदरा परिसरात हॅाटेल,लॅाज सह एम.टी.डी.सी.चे गेस्ट हाऊसही हाउसफुल झाले आहे. येणारा शनिवार रविवारला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. निसर्गाने हिरवा शालु नेसला आहे. या आदिवासी भागातील लोकांचे जिवनमान विस्कळीत झाले आहे.
कालपासुन २४ तासात अहमदनगर जिल्ह्यातील चेरापुंजी म्हणून ओळख असणाऱ्या घाटघरला ३४५ मी.मी,रतनवाडी ला ३२६ मी.मी. पांजरे ला ३१५ मी.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
पाणलोटक्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने धरणात नविन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. धरणाच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे.
भंडारदरा धरणात २४ तासात १ टी.एम.सी पेक्षा अधिक अर्थात १२३५ द.ल.घ.फु.नविन पाण्याची आवक होऊन आज सकाळी भंडारदरा धरणाचा पाणी साठा ८३०० द.ल.घ.फु होऊन धरण ७५ टक्के भरले आहे तर निळवंडे धरणाचा पाणीसाठा २९६० द.ल.घ.फु होऊन निळवंडे धरण ३६ टक्के भरले आहे.





