अहमदनगर – जायकवाडी पाणीप्रश्नावर दि. 12 डिसेंबरला सुनावणी

कोपरगाव -नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा हा पाणी संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने आमचे हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडून नगर-नाशिकवर अन्याय करू नये, यासाठी संजीवनी उद्योग समूहाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.
ज्येष्ठ वकील ऍड.कपिल सिब्बल यांनी संजीवनीच्या याचिकेची बाजू मांडली आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने आगामी 12 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवली असून यावेळी म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. यासह आगामी तारखेची सुनावणी पूर्ण होऊपर्यंत पाणी सोडले जाऊ नये, यासाठी शासनालाही आपण विनंती केल्याची माहिती कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवक कोल्हे यांनी दिली.
ऍड.कपिल सिब्बल व त्यांच्या सर्व विधीतज्ज्ञांसोबत बाजू मांडण्यासाठी आवश्यक माहितीवर विवेक कोल्हे यांनी स्वतः दिल्ली येथे उपस्थित राहून चर्चा केली. संजीवनीच्या पाणी सोडण्याच्या निर्णया विरोधातील हस्तक्षेप याचिकेवर 21 नोव्हेंबर 2023 रोजी सुनावणी झाली.12 डिसेंबर ही तारीख पुढील सुनावणीसाठी मिळाली आहे.





