अहमदनगर – आदर्श राज्यघटनेमुळे भारत बलशाली राष्ट्र

आ. आशुतोष काळे
कोपरगाव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तुत्व जेवढे महान होते, तेवढेच त्यांचे विचारही महान होते. त्यांच्या विचारात जीवन जगण्याची कला दडलेली होती. राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये त्यांच्या अजोड योगदानातून आपल्या देशाला आदर्श राज्यघटना मिळाली. त्यामुळे बलशाली राष्ट्र निर्माण होउ शकले. त्यांनी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञ राहून त्यांच्या स्वप्नातील भारत देशाच्या निर्मितीसाठी त्यांच्या विचारांशी नेहमी कटिबद्ध रहावे, असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शहरात बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला आ. काळे यांनी भेट दिली.याप्रसंगी त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. रक्तदान शिबिरासारखा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनी बुद्धिस्ट यंग फोर्सच्या सदस्यांचे कौतुक केले.
यावेळी बुद्धिस्ट यंग फोर्सचे विजय त्रिभुवन, भीमराव गंगावणे, मनोज शिंदे, राजेंद्र उशिरे, नितीन शिंदे, राजेंद्र पगारे, अरुण त्रिभुवन,
सोमनाथ खंडीझोड, संजय दुशिंग, सोमनाथ वाघ, देवेंद्र बनकर, नाना रोकडे, महेश दुशिंग, भारत सदर, रविंद्र धीवर, गणेश पवार, गांधी चॅरिटेबलचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, जिनिंग व प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे,
युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, सुनील मोकळ, प्रकाश दुशिंग, डॉ. तुषार गलांडे, जावेद शेख, अनिल बनसोडे आदींसह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





