अहमदनगर महापालिकेच्या वतीने औषध फवारणी

नगर – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने शहरात औषध फवारणी सुरु केली आहे. अग्निशमन विभागाकडे तीन वाहने असून मात्र या विभागाचे एकच वाहन सुरू आहे. बाकी वाहने ही शोभेची असल्याचे दिसत आहे.
करोना चा दिवसेन दिवस राज्यात आकडा वाढत असून जिल्ह्यात करोनो बाधित तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अतिदक्षता म्हणून जिल्हा रुंगालाय, मार्केट यार्ड तसेच सार्वजनिक परिसरात औषध फवारणी सुरू केली आहे.
औषध फवारणी करीत असताना महापालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांना करोनाच्या प्रादुर्भाव पासून वाचण्यासाठी घरीच रहा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, स्वतःचे संरक्षण स्वतः घरी राहूनच करा, मास्कचा वापर करा, अशी जनजागृती करीत शहरातील परिसरात औषध फवारणीचे काम चोख बजवित आहेत.
मात्र, अग्निशमन विभागाकडे एकच छोटे वाहन असून त्यात फक्त क्षमता 200 लिटर इतकीच आहे. त्यामुळे त्यांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. तसेच दुसरे वाहन नादुरुस्त असून ते केवळ शोभेची वस्तू उभ्या आहेत.





