अहमदनगर – ख्रिस्त राजा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा

नेवासा – तालुक्यातील घोडेगाव धर्मग्रामाचा आश्रयदाता ख्रिस्त राजा यांचा यात्रा सोहळा शनिवारी उत्साहात साजरा कारण्यात आला . लेझीमच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. प्रमुख धर्मगुरू रेव्ह.फा. सतिश कदम यांनी भाविकांना पवित्र साक्रामेंताचा आशीर्वाद दिला. त्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणुकीचे चर्चमध्ये स्वागत करण्यात आले होते. पवित्र साक्रामेंताची भक्ती घेतली व सर्वांसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. प्रमुख याजक व प्रवचनकार रेव्ह.फा.भाऊसाहेब संसारे यांनी पवित्र मिस्साला सुरुवात केली.
त्यांनी भाविकांना प्रवचन दिले. प्रमुख अतिथी म्हणून रेव्ह.फा.पिटर डिसोजा , रेव्ह.फा.प्रकाश राऊत व विविध धर्मग्रामातून धर्मगुरू फा.ज्यो गायकवाड, फा.विश्वास परेरा, फा.मायकल वाघमारे, फा.ब्रिस्टेन, फा.अब्राहाम रणणवरे, फा.ऑल्विन के,फा.जयसिंग, फा.जॉन गलदेवकर, फा.संपत भोसले, फा.ॲंन्थोनी स्वामी, फा.संजय पठारे, फा.डॉमनिक ब्राम्हणे, फा.थॉमस, फा.प्याट्रिक व फा.सिजो यावेळी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी रेव्ह.फा.सुनील गायकवाड यांनी ख्रिस्त व ख्रिस्तसभा या विषयावर प्रवचन केले. दुसऱ्या दिवशी रेव्ह.फा.ॲंन्थनी पाटोळे यांनी पवित्र मारिया व ख्रिस्तसभा या विषयावर प्रवचन केले. तिसऱ्या दिवशी रेव्ह.फा.डॉमनिक ब्राम्हणे यांनी याजकपद व ख्रिस्तसभा या विषयावर प्रवचन केले. पिटर बारगळ , संतोष गाढवे, अशोक मकासरे गुरुजी व तरुण मंडळ यांनी आपल्या सुंदर गायनाद्वारे पवित्र मिस्सामध्ये धार्मिक वातावरण निर्माण केले. यात्रेसाठी बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होता. यात्रेची सांगता भजनसंध्या कार्यक्रमाने झाली.





