श्रीरामपूर :आर्ट ऑफ लिव्हिंगच्यावतीने मंगळवार (दि.३) ते शनिवार (दि.७) शहरातील अन्नपूर्णा निवास, ऋषिकेश नाबरीया यांचे निवासस्थान, कुंभार गल्ली येथे आनंद अनुभूती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने गुरूदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ६ ते ९ या वेळेत योगा, प्राणायाम, ध्यान, ज्ञान व विश्वविख्यात प्रसिध्द असलेली तसेच करोडो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवणारी सुदर्शनक्रियाचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे.
या शिबिरामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते. ताण-तणाव चिंतेपासून मुक्त होण्यासाठी तसेच नैराश्य, नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकता व आत्मविश्वास वाढतो.
शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून सतिश आहेर, अर्चना सानप लाभणार आहे. नाव नोंदणी करून नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.