महसूलमंत्री विखे पाटील यांचा श्रीरामपुरात अभिष्टचिंतन सोहळा

श्रीरामपूर – राज्याचे महसूल मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा शनिवार दि. १५ जून रोजी वाढदिवस असल्याने श्रीरामपुरात त्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यासाठी श्रीरामपुरातील विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.
या बैठकीत तालुकाध्यक्ष दीपक पटारे, विधानसभा अध्यक्ष नितीन दिनकर, शरदराव नवले, नानासाहेब पवार, रवी पाटील, केतन खोरे, गिरीधर आसने, नाना शिंदे, अभिषेक खंडागळे, पांडुरंग आठरे, बाबा चिडे, संदिप चव्हाण, रामभाऊ लिप्टे, भाऊसाहेब बांदे, गणेश मुद्गुले, मारुती बिंगले, गणेश राठी, नानासाहेब तनपुरे, संदिप शेलार, भिमराज बागुल, विठ्ठलराव राऊत, दत्ता जाधव, मिलिंदकुमार साळवे, सतिष सौदागर, अॅड. प्रविण लिप्टे, रुपेश हरकल, महेंद्र पटारे, विशाल अंभोरे, पुष्पलता हरदास, मनोज नवले, रामभाऊ तरस, आसिफ पोपटिया, नितीन बांगडे, दिलीप भालेराव, जितेंद्र छाजेड, दीपक चव्हाण, महेश खरात, शंकरराव मुठे, सचिन गिरमे, अक्षय मांजरे, नारायण काळे, अरुण काळे, मुकुंद हापसे, विजय सदाफळ, सतीश कानडे, योगेश्वजा प्रसाद, बिंदीकर, सुबोध शेवंतेकर, प्रतिक वैद्य, पंकज करमासे यांच्यासह कार्यकर्ते या नियोजनाच्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक श्रीरामपूरच्या हिताचे निर्णय ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आपण त्यांचा यथोचित गौरव करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातून कार्यकर्ते घेऊन येऊन प्रत्येक गावाच्यावतीने याठिकाणी सत्कार करण्याचे ठरविण्यात आले. शहरातील दळवी वस्ती येथील स्वयंमवर मंगल कार्यालय येथे शनिवार दि. १५ जून रोजी सायंकाळी ४ वाजता हा सत्कार समारंभ होणार आहे.





