विमान कोसळलं अन् ‘त्यांच्या’ जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उड्या ; अहमदाबाद विमान अपघाताचा नवीन व्हिडोओ समोर

Ahmedabad plane crash। गुजरातमधील अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान १२ जून रोजी अपघातग्रस्त झाले. अहमदाबाद विमानतळाजवळील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीला धडकल्यानंतर हे विमान कोसळले. या विमानात २४१ लोक होते, त्यापैकी २४० जणांचा मृत्यू झाला. वसतिगृहाच्या भिंतीवर आदळल्याने अनेक विद्यार्थी या अपघाताचे बळीही ठरले. आता या घटनेचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विमान अपघातानंतर जवळच्या वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी स्वतःला कसे वाचवत आहेत हे दिसून येते. या व्हिडिओमध्ये एमबीबीएसचे विद्यार्थी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून कापड बांधून खाली येण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. हे विद्यार्थी चादरीच्या मदतीने उड्या मारताना दिसतात. Ahmedabad plane crash।
व्हिडिओमध्ये वसतिगृहासमोर आग दिसत आहे आणि लोक भीतीने ओरडत आहेत. काही विद्यार्थी बेडशीटपासून दोरी बनवताना दिसतात तर काही विद्यार्थी या चादरी वापरून रेलिंगवरून उडी मारून आपला जीव वाचवताना दिसतात.
१२ जून रोजी अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळावर जाणारे एअर इंडियाचे विमान एआय १७१ उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. विमान कोसळण्यापूर्वी, ते वसतिगृहाच्या इमारतीला धडकले, ज्यामुळे वसतिगृहाच्या इमारतीचे तसेच आजूबाजूच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले. एअर इंडियाच्या या विमानात २४२ लोक होते, ज्यात २३० प्रवासी, दोन पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते. यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार हे विमानातील एकमेव व्यक्ती आहेत जे वाचले. Ahmedabad plane crash।





